नागपूर :- सर्वत्र होळीचा सण येत्या रविवार २४ आणि सोमवार २५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशात होळी सणानिमित्त रविवार २४ मार्च रोजी सायंकाळी ०७.०० वाजता पासून ते सोमवार २५ मार्च रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण दिवस शहर बस सेवा बंद राहणार आहे. तर मंगळवार २६ मार्च रोजी सकाळी ६.०० वाजता पासून बसेसची वाहतूक पुर्ववत सुरु होईल अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाद्वारे देण्यात आली आहे.