वनमजूर , वनरक्षक, वनपालांच्या अडचणी लवकरच निकाली काढणार – वेणुगोपाल रेड्डी

नागपूर :-राज्याचे प्रधान सचिव वने यांनी महाराष्ट्र राज्यातील वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या अडचणी संबंधात वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने हरिसिंग सभागृह , नागपूर येथे बैठक घेतली.

या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) वाय एल पी राव उपस्थित होते . महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील व कार्याध्यक्ष माधव मानमोडे यांनी चर्चा केली.

या चर्चेत वनरक्षक, वनपाल यांची अन्याकारक वेतनश्रेणीत सुधारणा , महाराष्ट्रात मानीव दिनांक नुसार सामान सेवा ज्येष्टता यादी, अतिदुर्गम क्षेत्रात गस्ती करिता शासकीय दुचाकीची व्यवस्था, सातव्या वेतनानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे लाभ , प्रत्येक विभागीय कार्यालयात शाहिद स्तंभ उभारणे, शाहिद झालेल्यांच्या कुंटुंबाला सॅन २००६ पासून नुकसान भरपाई देणे , अतिरिक्त कामाचा कर्तव्य भत्ता – आहार भत्ता मिळणे , वनरक्षक भरती मध्ये पोलीस विभागाप्रमाणे वनरक्षक वनपालांच्या पाल्यांना आरक्षण, साप्ताहिक राजा, साप्ताहिक रजा न उपभोगल्यास अतिकालिक भत्ता, लग्नाच्या व स्वतःच्या वाढदिवसाची रजा मिळणे, कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना सुरु करणे , गणवेश व साहित्य भत्ता जो प्रलंबित आहे तो मिळणे,लागलीच होणाऱ्या वनरक्षक भरतीत वनमजूर यांना सन २०१२ च्या निर्णयानुसार सामावून घेणे , संपकालीन ११ दिवसाचे वेतन मिळणे , वन्यजीव विभागातील पन्नास वर्षावरील वनरक्षक वनपालांना बदली मध्ये प्रादेशिक विभागात प्राधान्य या सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली.

प्रधान सचिव रेड्डी यांनी मंत्री महोदयांसमवेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन संघटनेला दिले. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( प्रशासन ) शौमिता बिश्वास सुद्धा चर्चेच्या वेळी उपस्थित होत्या.

संघटनेचे उपाध्यक्ष शिवसंभ घोडके , विशाल मंत्रीवार , सतीश गडलिंगे, प्रभाकर अंकारी, भारत मडावी , विजय रामटेके,  पूणम बुद्धावर, आनंद तिडके, अरुण पेंदोरकर, राजेश पाथर्डे ,  विजय मोरे, ईश्वर मांडवकर, रामेश्वर धोंडगे, सहदेव डोसाल्वार,  शंकर रंगूवर इत्यादी उपस्थित होते.

 

 

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Additional Chief Secretary Bhushan Gagrani and UD officials Travel by Metro

Fri Dec 23 , 2022
NAGPUR : The winter session of State Legislature is being held in Nagpur and today Additional Chief Secretary (Chief Minister Secretariat & Urban Development-I) Bhushan Gagrani and his team of officials took a Metro Ride. The officials traveled from Zero Mile Metro Station to Airport South and then to Sitabuldi Interchange Metro Station. Maha Metro Managing Director Dr Brijesh Dixit […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!