संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरातील आर्दश हिंदी हायस्कुल शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम यांचा सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला .
शनिवार (दि.२९) एप्रिलला आदर्श हायस्कुल आणि आयडियल काॅ.हि.प्रा शाळा कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कुल मुख्याध्यापिका चंद्रकला एन मेश्राम यांचा सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष पुष्पा आर त्रिवेदी, सचिव भरत सावळे, सहसचिव एन. डी. मेश्राम, माजी मुख्याध्यापक गोंड, आयडि यल काॅ.हि.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आर.व्ही.गोंड प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांचा हस्ते शारदा मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी, शिक्षिका, शिक्षिकांनी सत्कार मुर्ती चंद्रकला मेश्राम यांना शाॅल, श्रीफल व भेट वस्तु देऊन सत्कार केेला. चंद्रकला मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव आपल्या मार्गदर्शनातुन व्यकत केला. संस्थेचे अध्यक्ष पुष्पा त्रिवेदी यांनी चंद्रकला मेश्राम यांच्या सेवा कार्याचे कौतुक करून त्यांना उत्तम आरो ग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच शिक्षक, शिक्षिका यांनी चंद्रकला मेश्राम यांच्या कारकीर्दीतील आठवणींना उजाळा देत चंद्रकला मेश्राम यांच्या नेतृत्वात शाळेत अनेक उपक्रम राबविल्याने शाळेची वाटचाल सुरळीत जोमाने सुरू आहे. अश्या गौरवनित भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते भेट देऊन चंद्रकला मेश्राम यांच्या कार्याचे कौतुक करित पुष्प गुच्छ देऊन निरोगी आरोग्यासह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोज डोंगरे यांनी तर आभार ताराचंद चापरे यानी व्यक्त केले. शेवटी स्नेह भोजना सह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके, माधव काठोके, वरिष्ठ पत्रकार कमल सिंह यादव, शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष व युवा पत्रकार ऋृषभ बावनकर, कार्याध्यक्ष योगराज आकरे, वरिष्ठ मार्गदर्शक भरत सावळे, शाहरुख खान, प्रशांत मसार सह आदर्श हायस्कुल आणि आयडियल काॅ.हि. प्राथमिक शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षके त्तर कर्मचारी उपस्थित होते.