संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – शिवशक्ती डहाका मंडळ कान्द्री व्दारे जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व. भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समृर्ती प्रित्यर्थ डहाका मंडळा व्दारे गुरुपुजा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच कोल माईन्स रोड, हनुमान मंदिर कांन्द्री -कन्हान येथे करण्यात आले होते. गुरूपुजा कार्यक्रमा त शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे आकाशवाणी, कॅसेट सिंगर यांचा सत्कार करण्यात आला.
गुरूपुजा कार्यक्रमाचे उद्घाटन शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, आकाशवाणी, कॅसेट सिंगर यांच्या हस्ते व कान्द्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच शामकुमार (बबलु) बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पुजा अर्चना करून शिव शक्ती डहाका मंडळ कान्द्री व्दारे भारतीय कलंगी शाहिर मंडळ अध्यक्ष शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तदंतर मंदिरात भजन, कीर्तन व डहाका प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्वांचे आभार व्यक्त करून गुरुपुजा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी बंटी आकरे, छोटु सिंग, शिवाजी चकोले, कवडु आकरे, झिबल सरोदे, एकनाथ सरोदे, वासुदेव आकरे, रामा हिवरकर, उषा वंजारी, वंदना घुमडे, उषा वाडीभस्मे, इंदु टेमरे, सुनिल सरोदे, मधुकर कामडे, फजित बावने सह ग्रामस्थ नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वामन देशमुख, प्रविण आकरे, मनोज, अशोक किरपान, राजेश पोटभरे , विजय आकरे, विक्रम वांढरे, ब्रम्हा नवघरे, नथुजी चरडे, भोजराज वासाडे, शालीकराम शेंडे, गिरधर बावने, नितेश वांढरे आदीने सहकार्य केले.