चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना आदरांजली

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ३० जानेवारी हुतात्मा दिन प्रसंगी सकाळी १०:०० वाजता हुतात्मा स्मारक, सिव्हिल लाईन, येथे सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.     देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो.मनपाच्या वतीने सर्वप्रथम जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, नंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र व माल्यार्पण , हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र व माल्यार्पण व गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले तसेच काही क्षण मौन पाळुन करून आदरांजली वाहण्यात आली,

याप्रसंगी मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, व सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे व सचिन माकोडे, उपअभियंता रवींद्र हजारे, अनिल बाकरवाले, प्रदीप पाटील, विकास दानव, पिंपळशेंडे, गुरुदास नवले,आशीष जीवतोडे,नरेंद्र जनबंधु, प्रदीप मडावी, माधवी दाणी, संघमित्रा पुणेकर, बंटी बेरिया, जय पालीवाल उपस्थीत होते.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com