कोदामेंढी :- अरोली – कोदामेंढी जि प क्षेत्र पं स कोदामेंढी गण, ग्रामपंचायत सिरसोली अंतर्गत येत असलेल्या वायगाव येथील इंदुताई मेमोरियल हायस्कूल या शाळेतर्फे शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बँड बाजाच्या पथकासह मतदान जनजागृती चे हाती फलक घेऊन आज दिनांक 16 नोव्हेंबर शनिवारला सकाळी नऊ ते दहा वाजता दरम्यान संपूर्ण गावात प्रभात फेरी काढून मतदान जनजागृती केली.
तुमच्या हातात आहे, ताकत योग्य उमेदवाराला द्या मत. चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या. नवे तारे, नवी दिशा, मतदान आहे उद्याची आशा. सेवाधर्म काम, चला करूया मतदान. जागरूक नागरिक होऊया, अभिमानाने मतदान करूया .जो देईल नोट, त्याला कधीच करू नका वोट. असे मतदान जनजागृती म्हणी लिहिलेले फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव दणाणून सोडले व येत्या 20 तारखेला गावातील सर्व मतदारांनी 100% हमखास मतदान करण्याचे आव्हान या जनजागृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केले आहे.
यशस्वीतेसाठी या शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक कटरे, शिक्षक मेश्राम ,शिक्षिका बागडे ,बोरकर लिपिक बाबुलक प्रामुख्याने उपस्थित होते. अशाच प्रकारची मतदान जनजागृती प्रभात फेरी येथील जिल्हा परिषद शाळेतर्फे , इंदुताई मेमोरियल शाळेच्या प्रभात फेरीपूर्वी सकाळी आठ ते नऊ दरम्यान काढण्यात आल्याचे वायगाव येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायधने यांनी भ्रमणध्वनीवरून विचारपूस करीत असताना सांगितले .