माँ उमिया औद्योगिक सहकारी वसाहतीची चौकशी करून कारवाही करा-जि.प. सदस्य दिनेश ढोले..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी,

कामठी ता प्र 8 :- कामठी तालुक्यात वसाहत करून वसलेल्या माँ उमिया औद्योगिक सहकारी वसाहतीची पोलीस चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी केले आहे.

कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या मौजा कापसी(बु),तरोडी, आसोली या गावाच्या सीमेलगत व सीमा अंतर्गत मॉ उमिया औद्योगिक वसाहत वसलेली आहे.सदर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीचा गैरवापर झाल्याचे दिसून येत आहे.जसे की उपरोक्त नमुद तिन्ही गावाच्या सीमेला लागून असणारे पांधन रस्ते,शिवधुरे,तसेच नैसर्गिक रित्या वाहत असलेले पाटचारे, नाले, ढोढे सोबतच शासकीय जमिमीचा त्या ठिकाणी वयक्तिक वापर होत आहे.सोबतच हा संपूर्ण औद्योगिक परिसर शासनाचे नियम धाब्यावर ठेवून वसविला आहे.व या मार्फत सोसायटी वासियानो लोकांची फसवणूक करून कोटी रुपयांचा नफा या माध्यमातून अर्जित केला आहे तसेच या औद्योगिक सोसायटी मध्ये कोणत्याही सुविधा पुरविल्या नसल्यामुळे या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच या परिसरात छोटेमोठे उद्योग सुरू झालेले आहेत परंतु कोणत्याही व्यवसायिककडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही या परिसरात बरेचदा आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत ,भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते तेव्हा वास्तविकता या संपूर्ण माँ उमिया औद्योगिक वसाहतीने कोणकोणत्या विभागाकडून परवानगी घेतल्या वा नाही , शासनाच्या कोणत्या नियमाला अनुसरून संपूर्ण औद्योगिक वसाहत वसविली आहे ,शासकीय जागेवर किती अतिक्रमण केलेले आहे याची संपूर्ण चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाही करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी पोलीस निरीक्षक कमलाकर गडडिमे ला दिलेल्या निवेदनातुन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतीय संविधान गौरव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विकास रंगारी यांची सर्वानुमते निवड..

Sat Oct 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 8 :- आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत भारतीय संविधान गौरव समिती कामठी च्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विकास रंगारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष नितीन रायबोले, महासचिवपदी माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील,सचिवपदी सुभाष सोमकुवर,कोषाध्यक्ष सुधा रंगारी यांची निवड करण्यात आली तर सल्लागार पदी उमाकांत चिमनकर, विजय पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com