अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहाय्याने उभारला पोल्ट्री व्यवसाय – अमित माने यांची यशोगाथा

भंडारा :-आज अनेक तरूण- तरुणाई नौकरीसाठी परिश्रम करतांना दिसतात.मात्र शासकीय किंवा खासगी नोकरीच्या मागे न लागता कष्ट,मेहनत व शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन यशस्वी उदयोग करता येतो.याचे उत्कृष्ट उदाहरण तुमसर तालुक्यातील अमित सुरेश माने यांनी स्वतचा पोल्ट्री व्यवसाय उभारून दाखवून दिले आहे.महीन्याकाठी 40 हजार रूपये नफा कमाविणाऱ्या अमितने अण्णा पाटील आर्थिक विकास महामंडळच्या आर्थिक सहाय योजनेचा लाभ घेतला.

अमितचा संपूर्ण परिवार शेतीवर अवलंबून होता.त्याचप्रमाणे वाढत्या खर्चामुळे शेती खर्चात वाढ झाली आहे.नैसर्गिक बदलामुळे वातावरणात बदल त्यामुळे उत्पन्नात घट होऊ लागली आणि शेतीमालात वाढ झाली नाही.त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकुल होत गेली.त्यामुळे त्यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना व्यवसाय करण्यात अडचणी येत होत्या.

व्यवसायासाठी शासकीय योजनेबाबत विचारणा केली असता अमितला मित्राकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या व्याज परतावा योजनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी भंडारा येथील कार्यालयात जावून योजनेची माहिती मिळवली. योजनेच्या नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र जमा करुन नोंदणी क्रमांक मिळवला. त्यानंतर ती कागदपत्रे घेऊन कॅनरा बॅक, तुमसर येथे जाऊन योजनेबद्दल बॅकेला आवश्यक संपूर्ण कागदपत्रे देऊन कर्ज मंजूर झाले.

पोल्ट्री फार्मच्या बांधकामाकरिता तीन चार महीन्याचा कालावधी त्यांना लागला. पोल्ट्री फार्म 7 हजार चौरस.फुट असून त्यामध्ये 5 हजार कोंबडी व पिल्लांची वास्तव्य क्षमता पोल्ट्री फार्म आहे.त्यात आम्ही बॉयलर पक्षाचे कोंबडी पालन करतो.चांगल्या दर्जाच्या कोबडी पिल्ले कंपनीकडून विकत घेतले आणि त्यांना लागणारे खाद्यही हे विकत घेतल्याने त्यांची वाढ लवकर व चांगली झाली.

कोंबडीच्या पिल्लांना 40 ते 45 दिवस संगोपन केल्यानंतर त्यांची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. एका पक्षाचे वजन साधारण 2 ते 2.50 किलो ग्रॉम येते. त्यांच्या विक्रीव्दारे महिन्याला 40 ते 45 हजार रुपयांचा नफा मिळत असतो. पोल्ट्री फार्मवर त्यांनी इतरांना ही रोजगार दिला आहे. या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा तसेच जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ यांचे अधिकारी श्री. बोंद्रे यांच्याकडून नियमीत मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धान विक्री करीता शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, 20 केंद्रावर खरेदी सुरू पणन विभागाचे आवाहन

Thu Oct 5 , 2023
भंडारा :- आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2023-24 करीता भंडारा धान विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळविण्यात येते की,पणन महासंघाच्या अ वर्ग सभासद असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी. त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की जमिनीचा सातबारा उतारा,नमुना,8,बॅकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश,अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!