– सान्वी महाजनला कांस्यपदक
नागपूर :- साई एनसीओई, रोहतक हरयाणा येथे नुकत्याच झालेल्या आरइसी नॉर्थन ओपन टॅलेंट हंट नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भिलगावच्या अनंत देशमुखने सुवर्णपदक तर नागपुरच्या सान्वी महाजनने कांस्यपदक प्राप्त केले.
स्पर्धेत सबज्युनिअर मुलांच्या गटात अनंतची अंतिम लढत झारखंडच्या सोमलाल मुर्मू सोबत झाली. ५८-६१ वजनगटात तिसऱ्या राउंड पर्यंत झालेल्या या लढतीत अनंतने ५-० ने सोमलालला नमवित सुवर्णपदक प्राप्त केले. तर सान्वी महाजनला उपांत्यफेरीत हरयणाच्या राखीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने तिला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. अनंत आणि सान्वी वरिष्ठ बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित यांच्या मार्गदर्शनात मानकापुर क्रीडा संकुल परिसरात नियमित सराव करतात. स्पर्धेत महाराष्ट्राचे मल्हार साबळे, धैर्य कोठी, समिक्षा सिंग, नव्या नवेली, मयुरेश जाधव सहभागी झाले होते. महाराष्ट्र संघासोबत प्रशिक्षक म्हणून निर्मल शर्मा तर व्यवस्थापक म्हणून रौनक खांबलकर, अल्फिया पठाण सोबत होते.