लोकप्रीय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे पुण्यस्मूर्ती उत्सवानिमित्त आंतरशालेय कबड्डी स्पर्धा थाटात संपन्न 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

ऍड सुलेखा कुंभारे ,आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

– 15 जानेवारी 2023 रोजी पालखी मिरवणुकीचे आयोजन

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोकप्रीय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यस्मूर्ती उत्सवाचे आयोजन हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी ते 15 जानेवारी 2023 पर्यंत करण्यात आले. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आंतरशालेय कबड्डी स्पर्धा,पालखी व अखाडा मिरवणूक, मानवंदना इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकप्रीय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यस्मूर्ती उत्सवानिमित्त हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेद्वारा संचालित हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,ऍड दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी शाळेच्या वतीने 12 व 13 जानेवारी रोजी आंतरशालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .या कबड्डी सामन्यात कामठी शहर व ग्रामीण भागातून 15 शाळेने सहभाग घेतला होता. शुक्रवार 13 जानेवारी रोजी कबड्डी सामन्यांच्या विजेत्यांना ऍड सुलेखा कुंभारे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते पारितोषिक मानपत्र व बक्षीस वितरण करून सम्माणीत करण्यात आले होते.

आंतरशालेय कबड्डी सामन्यांच्या समारोपिय कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आमदार टेकचंद सावरकर,तसेच अध्यक्षस्थानी असलेले हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सुलेखा कुंभारे यांनी सुरुवातीला लोकप्रिय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी शांतीचे प्रतीक असलेले कबुतर संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले.उपस्थित अतिथी समोर कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात आला.

कबड्डी सामन्यांमध्ये सहभागी 14 वर्षे वयोगटातील प्रथम पारितोषिक सेंट जेनेली कॉन्व्हेंट व द्वितीय पारितोषिक नूतन सरस्वती कॉन्व्हेंट यांनी मिळवला तसेच 16 वर्षे वयोगटातील प्रथम पारितोषिक ऍड. दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी व द्वितीय पारितोषिक हिरांजली हायस्कुल भोवरी यांनी पटकाविला तर मुलींच्या टीम मधून प्रथम पारितोषिक हरदास हायस्कुल तर द्वितीय पारितोषिक अवंतिका हायस्कुल यांनी मिळविला.विजेत्या समूहांना ऍड. सुलेखा कुंभारे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक मानपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरदास विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश सेंगर ,संचालन विनोद जुमडे यांनी केले, तर आभार ड्रॅगन इंटरनेशनल स्कुलच्या प्रिंसिपल अंबरीन फातिमा यांनी मानले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुकेशीनी मुरारकर, राजेश गजभिये, देवेंद्र जगताप ,धनंजय चौरे, कमाल अख्तर सलाम,मेघा स्वामी,सेजल मानवटकर,तृप्ती चव्हाण,प्राजक्ता भुरे, खुशबू वारखडे, दीक्षा पिल्ले, सोनल डोंगरे,निधी शेंडे, प्रविण चहांदे, अजमत कमाल अन्सारी,विजय अलोने इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

-15 जानेवारी रोजी पालखी मिरवणूक व हरदास घाट कन्हान येथे मेळाव्याचे आयोजन

कामठी-दरवर्षीप्रमाने यावर्षी सुद्धा लोकप्रिय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यस्मूर्ती उत्सवानिमित्त हरदास नगर कामठी येथून पालखी मिरवणुकीचा शुभारंभ होईल.सर्वप्रथम मोटर स्टँड चौक येथील बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्याला ऍड. सुलेखा कुंभारे यांच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात येईल.याप्रसंगी समता सैनिक दल तसेच हरदास नगर येथील लेझीम पथक ,हरदास विद्यालय येथील लेझीम पथक,हरदास व्यायाम शाळाच्या अखाडा द्वारे बाबू हरदास एल एन व दादासाहेब कुंभारेना मानवंदना वाहण्यात येईल. ही पालखी मिरवणूक जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व मानवंदना करून कामठी शहरातील प्रमुख मार्गानी भ्रमण करीत कन्हान येथील हरदास घाट येथे सायंकाळी 4 वाजता मिरवणूक पोहोचेल.

या पालखी मिरवणुकीत हरदास नगर येथील हरदास व्यायाम शाळा अखाडा,दादासाहेब कुंभारे येथील कॉलोनी येथील दादासाहेब कुंभारे अखाडा,जयभीम चौक येथील प्रशिक अखाडा,नया बाजार येथील अय्या वस्ताद अखाडा,इत्यादी आखाडे तसेच हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,ऍड दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी येथील विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या पालखी मिरवणुकीत सहभागी होतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षक मतदार संघ निवडणूक- गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 पर्यंत

Sat Jan 14 , 2023
गडचिरोली : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -2022 च्या निवडणूक अनुषंगाने सर्व शिक्षक मतदारांना सुचित करण्यात येते की, मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक 30.01.2023 रोजी सकाळी 08.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंतची वेळ ठरवून दिलेली होती. परंतू त्यात मा. भारत निवडणूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com