पोलीस स्टेशन सावनेर येथील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई 

नागपुर :- फिर्यादी नामे आयुष कुदरत खान वय ५३ वर्ष, रा. मोतीलाल नगर करोट जेल भोपाल हा आपले ताब्यातील आयसर ट्रक क्र. एम. एच. ४०. सी. एम. ०५१९ गाडी मध्ये ९ म्हैशी जनावरे घेवुन जात असता यातील अज्ञात आरोपीतांनी फीर्यादीची आयसर गाडी रस्त्यात अडवून ठाण्यात चल अशी धमकी देवुन आयसर गाडी व गाडी मधील ९ म्हशी व फिर्यादीचे सॅमसंग कंपनीचा कीपेट मोबाईल बळजबरीने लटुन पळुन गेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे सावनेर येथे अप. क्र. २९६ / २३ कलम ३९२, ३४ भादवि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. सदर घटने पासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. तेव्हापासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत होते.

तपासा दरम्यान आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक २५/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त खात्रीशीर बातमी वरून पोलीस स्टेशन सावनेर अप क्र. २९६ / २०२३ कलम ३९२, ३४ भादवि मधील पाहीले आरोपी नामे मोबिन अहमद समसुद्दीन अहमद, वय ३५ वर्ष रा. महबूब पुरा टिपू सुलतान चौक यशोधरा नगर नागपूर हा त्याच्या राहत्या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद ठिकाणी जावून पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथील स्टाफच्या मदतीने आरोपीचा शोध घेवुन नमुद आरोपी हा टिपू सुलतान चौक येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. नमुद आरोपीस ताब्यात घेवुन सखोल विचापूरस केली असता त्याने नमुद गुन्हा त्याचा मित्र नामे इम्रान खान रा. छिंदवाडा व भाऊ शमीम यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले. त्यामुळे नमुद आरोपीस पुढील कायदेशीर प्रक्रीयेकरीता पोलीस स्टेशन सावनेर येथे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोलीस सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलदार, आशिषसिंग ठाकुर, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, पोलीस नायक आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदीचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद‌्गार

Thu Jun 29 , 2023
‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न चंद्रपूर :- देशगौरव,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अद्भुत आहे. असे नेतृत्व भारताला लाभणे हे आपले भाग्य आहे . अश्या महान नेत्यांचे कार्य राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमक्या शब्दांमध्ये ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे जे व्रत हाती घेतले आहे ते स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!