चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी – कर्मचारी व योगनृत्य परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन योगासने व योगनृत्य करून साजरा करण्यात आला.योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी ३ दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मनपा इमारत वाहनतळ येथे १९ जून ते २१ जून या कालावधीत करण्यात आले होते. या ३ दिवसीय कार्यक्रमांमध्ये मनपा कर्मचारी व योगनृत्य परिवाराच्या सदस्यांनी भारतीय सांस्कृतीक नाटिका, सामाजीक संदेश देणारे नृत्य सादर केले. तसेच तबला वादन,हॅपी स्ट्रीट,विविध खेळ, योग नृत्य,हास्य योग,करोडपती योगा,रिदमिक योगा,पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमास नागरीकांची उपस्थिती लक्षणीय होती.
आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो.योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दररोज योग केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.
योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मनपा, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराद्वारे २२ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांचा अनेक नागरीकांनी लाभ झाला आहे. निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ही योग प्राणायाम शिबिरांची मदत झाली असुन याद्वारे योगचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळुन असुन शहरातील नागरीकांचे स्वास्थ्य निरोगी राखण्याचे कार्य केले जात आहे.
कार्यक्रमात उपायुक्त अशोक गराटे,योगनृत्यचे जनक गोपाल मुंदडा,डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ.अमोल शेळके,डॉ.नरेंद्र जनबंधू डॉ.अतुल चटकी,नागेश नित,विकास दानव,अमित फुलझेले, योगनृत्य परिवाराचे सुरेश घोडके, आशिष झा, प्रशांत कत्तूरवार, धिरेंद्रकुमार मिश्रा, प्रमोद बाविस्कर, मंगेश खोब्रागडे,हरिदास नागपुरे,श्रीकांत रॉय, धनंजय तावाडे, किशोरी हिरुडकर,मुग्धा खांडे, पुनम पिसे, रंजु मोडक जितेंद्र ईजगिरवार यांचा सहभाग होता.