केळवद :- दिनांक ०६/०५/२०२३ रोजी पो.स्टे. केळवद येथील स्टाफ पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा खुर्सापार से सावळी फाटा येथुन एका पांढ-या रंगाची पिकअप गाडी मध्ये विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन केळवद पोलीस पथक तात्काळ मौजा खुर्सापार ते सावळी फाटा येथे गेले असता तेथे एक पांढ-या रंगाची पिकअप गाडी येतांना दिसली. त्यास थांबण्याचा इशारा केला असता पोलिसांना गणवेशात पाहून पिकअप चालक याने पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदीचे ठिकाणी वेगाने वाहन चालवुन वाहन चालक याचा पाठलाग करून वाहनास थांबविले असता आरोपी हा अंधाराचा फायदा घेउन घटनास्थळाहून वाहन सोडुन पळुन गेला. घटनास्थळी यातील पांढ-या रंगाची पिकअप गाडी क्र एमएच 49 ए टी 9361 या चालक याने आपल्या ताब्यातील वाहनात १) ८ नग जिवंत गाई गोवंश प्रत्येकी किमती १०,०००/- रु प्रमाणे किंमती ८०,०००/- रुपये २) १ नग मृत गाई गौवंश प्रत्येकी ०० /- रुपये ३) पांढ-या रंगाची पिकअप गाडी क्र. एम. एच. ४९ ए.टी.- ९३६१ किमती ७,००,०००/- रुपये मध्ये जनावरे अत्यंत क्रूर व निर्दयतेने डांबुन आखुड दोरीने बांधुन त्यांना चारा पाण्याची सोय न करता कोंबुन दाटीवाटीने अपु-या जागेत ठेवुन कतली करीता वाहतुक करतांना मिळुन आले. आरोपीकडुन वाहनासह असा एकुण किंमती ७,८०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरकार तर्फे पोशि/ २३३९ सचिन भगवान येळकर वय ३१ वर्ष रा. पो.स्टे. केळवद जि. नागपूर प्रा. यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपीविरुद्ध कलम २७९, ४२९ भा.द.वि. सह कलम १२ (२) (घ) (ड) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधि. १९६०, सहकलम ५ (अ) ९ महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनीयम १९९५ सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम सहकलम १८४ मोवाका कायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास सफी किशोर ठाकरे व नं १५४७ हे करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केळवद येथील ठाणेदार अमितकुमार आत्राम, सहायक फौजदार किशोर ठाकरे, पोलीस नायक दीपक इंगळे, सचिन येरकर, श्रीधर कुलकर्णी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.