सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ यांना गुप्त बातमीव्दारे मिळालेल्या माहिती वरून धापेवाडा माही लॉज वर पोस्टे सावनेर येथील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २४/०२/२०२४ चे १४.३० वा. ते १८.४६ वा. दरम्यान रेड केली असता यातील आरोपी माहीलॉज मालक सुशिल नारायणराव गजभिये वय ३२ वर्ष, रा. सावनेर वाघोडा वार्ड नं. २ ता. सावनेर जि. नागपुर तसेच मॅनेजर विनोद जर्नादन खुरपडे, वय ३८ वर्ष, रा. भालेराव शाळेमागे सावनेर ता. सावनेर जि. नागपुर यांनी स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता पिडीत मुलींना अधिक पैश्याचे आमिष दाखवून त्यांना यातील आरोपी यांना नमुद ठिकाणी येण्यास सांगून देहव्यापारास जागा उपलब्ध करुन देवून पिडीत मुलींना ग्राहकास पुरवुन कुंटणखाना चालवित होते. तसेच इतर आरोपी नामे- नंदलाल धोंडबाजी गावंडे, वय ५० वर्ष, रा. मडासावंगी ता. कळमेश्वर जि. नागपूर, पुरूषोत्तम उमाजी चिंचुळकर, वय ६२ वर्ष, रा. वाकोडी हे पिडीत मुलीना देह व्यापाराकरीता मोबदला देवुन त्यांचेसोवत अनैतीक संबंध प्रस्थापीत करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे मिळून आल्याचे फिर्यादी यांचे लेखी तक्रारीवरून आरोपीतांविरूध्द अप. क्र. २०७/२४ कलम ३७०, ३४ भादंवि सहकलम ३, (२) (ए), (सि) (डी) अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोहार नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, नागपुर ग्रामीण, सहा. पोलीस अधिक्षक अनिल मस्के सावनेर विभाग सावनेर नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सपोनि मंगला मोकाशे, पोउपनि स्वप्नील गेडाम, पोहवा अतुल खोडनकर, नापोशि अंकुश शास्त्री, मपोहवा ज्योती गाडीगोने, पोशि सतिश देवकते, अंकुश मुळे, नितेश पुसाम, मपोशि स्वाती लोनकर यांनी कार्यवाही केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि व्यंकटेश दोनोडे करत आहेत.