खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना नागपूर ग्रामीण पोलीसांनी केली अटक

उमरेड :- मौजा खेडी शिवार येथील तारणा फाटा, उमरेड ते सेव डांबरी रोडवर उमरेड ०३ किमी पूर्व येथे दि. २५/०२/२४ चे १०/०० वा. ते १०/३० वा. दरम्यान सन २०२३ मध्ये झालेल्या गामपंचायत मौजा सेव येथील निवडणुकीत फिर्यादी नामे- विकास पांडुरंग मेश्राम, वय ५० वर्षे, रा. सेव ता. उमरेड ग्रामपंचायत सेव व फिर्यादीची पत्नी उभे होते. त्यात दोघेही निवडून येवुन फिर्यादी सदस्य झाले व फिर्यादीची पत्नी उपसरपंच झाली तसेच सेव गावात राहणारा आरोपी राजेश उर्फ लादेन देवराव हजारे, वय ४७ वर्षे, रा. उमरेड हा आधी सरपंच पदावर होता व सन २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत हरलेला होता. त्यामुळे त्याच्यात व फिर्यादीत वादविवाद असुन दि. २५/०२/२४ रोजी सकाळी अंदाजे १०/०० या दरम्यान फिर्यादी मोटार सायकलने आंबेडकर कॉलनी उमरेड येथुन मौजा सेव येथील शेतीवर जाण्यासाठी निघाले असता तारण्या फाट्यापासुन सेवकडे जाणा-या रोडवर जात असताना मागुन एक पांढ-या रंगाची कार आली व त्यामधील इसमाने चालत्या गाडीतुन फिर्यादीच्या पाठीवर लोखंडी रॉड मारून ‘तुने मले ईलेक्शनमध्ये हरविलास तुला जास्त मस्ती चढली आहे आणि अनिकेतला ग्रामपंचायतच्या कामावरून का काढले, त्याचे हात पाय तोड” म्हणून राजेश उर्फ लादेन देवराव हजारे, वय ४७ वर्षे, रा. उमरेड व अनिकेत नामडे गणवीर, वय २५, रा. उमरेड यांनी त्यांच्या जवळील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या दोन्ही हातावर दोन्ही पायावर मारुन दोन्ही हात पाय फॅक्चर करुन जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे उमरेड येथे आरोपीतांविरूद्ध कलम ३०७, ३४ भांदवि, सहकलम ३(२) (व्ही ए) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयातील दोन्ही आरोपीतांना उमरेड पोलीसांनी ४ तासाचे आत अटक केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मृत्युने मात केली मित्राने हार पत्करली 

Mon Feb 26 , 2024
मागला जवळपास संपूर्ण आठवडा मी फूड फेस्टिवल निमित्ते दुबईत व्यस्त होतो. 23 फेब्रुवारीला सकाळपासून दुबईत फिरायचे थोडेफार शॉपिंग, मनाशी ठरवून तयार झालो आणि लागोपाठ त्या बातम्या कानावर थडकल्या, आधी मनोहरपंत गेल्याची आणि लागोपाठ दुसरी बातमी, आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मृत्यूची, पंत मुख्यमंत्री असतांना मी त्यांच्या सतत संपर्कात असे, त्यांचा एवढा लाडका कि त्यांनी मुख्यमंत्री असतांना मला ते संगतीने इजिप्त इस्रायल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com