‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात’ ‘पाण्याचे नियोजन आणि महत्व’ या विषयावर जल साक्षरता केंद्र, यशदा, पुणे, येथील माजी कार्यकारी संचालक तथा ‘चला जाणूया नदीला’ च्या राज्यस्तरीय समितीतील अशासकीय सदस्य, जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. आपण दैनंदिन कामांसाठी जे पाणी वापरतो त्यातील बहुतांश पाणी भूजलातून येते. आपल्याकडे स्थिर आणि निरोगी जीवनशैलीसाठी नैसर्गिक संसाधने खूप महत्वाची भूमिका बजावतात. चांगल्या आरोग्यासाठी गोड्या पाण्याचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भूजलाचा वापर वाढत असून पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता पडू नये, तसेच भूजल संवर्धनासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च रोजी ‘जागतिक जल दिन’ म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य लक्षात घेता ‘पाण्याचे नियोजन आणि महत्व’ या विषयावर जल अभ्यासक डॉ. पांडे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. पांडे यांची मुलाखत बुधवार दि. 27, गुरुवार दि. 28, शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि.30 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"राजकारणातील फुटक्या आरशा"चे अनोखे प्रकाशन

Tue Mar 26 , 2024
नागपूर :- पत्रकार विनोद देशमुख यांच्या “राजकारणातील फुटका आरसा” या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन पत्रकारांचे महागुरू मा. गो. वैद्य यांच्या अर्धपुतळ्याला पहिली छापिल प्रत अर्पण करून होळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर रविवारी दुपारी करण्यात आले. विदर्भातील नामवंत सूत्रसंचालक, वक्ते, लेखक प्रकाश एदलाबादकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. सिव्हिल लाईन मधील व्हीआयपी रोडवरील मुख्यमंत्री सचिवालयाच्या (हैदराबाद हाऊस) प्रवेशद्वारालगत मागोंचा हा अर्धपुतळा नागपूर मेट्रो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com