नागपूर :- दिनांक १३.०१.२०२५ ते दिनांक १९.०१.२०२५ दरम्यान दिल्ली येथे होणान्या खो खो विश्वकप २०२५ स्पर्धेकरीता, खोखो फेडरेशन ऑफ इंडिया कडुन पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथक येथे नेमणुकीस असलेले, पोलीस अंमलदार शेषराव रेवतकर यांची इंटरनॅशनल टेक्नीकल ऑफोशीअल (आय.टी.ओ) म्हणून निवड करण्यात आली. पोलीस अंमलदार शेषराव रेवतकर हे नागपूर शहर पोलीस दलातील खोखो संघाचे वरिष्ठ खेळाडू असुन, त्यांनी विवीध राष्ट्रीय खोखो स्पर्धेत विदर्भाचे, राज्याचे नागपूर शहर पोलीस दलातर्फे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचे या यशाबद्दल डॉ. रविन्द्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी तसेच राखीव पोलीस निरीक्षक विनोद तिवारी व विदर्भ खोखो संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच रेफरी बोर्डचे सर्व पदाधिकारी व गुन्हेशाखखेचे पोनि. गजानन गुल्हाने, किडा प्रमुख धर्मेन्द्रसिंग ठाकुर, राकेश पराची, कुणाल वाईकर, राजेश्वर ढोबळे, अमर चौधरी, पराग बंसोले व समस्त खेळाडू मित्र यांनी शुभेच्छा दिल्या.
नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार यांची विश्वकप २०२५ खोखो स्पर्धेकरीता निवड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com