पो.स्टे. खापरखेडा हद्दीमधील सट्टापट्टी लिहणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई

खापरखेडा :- पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, यातील आरोपी राजेश श्रवण बंड वय 45 वर्ष राहणार दहेगाव रंगारी वार्ड क्रमांक चार खापरखेडा हा स्वतःचे पानठेल्यामध्ये कल्यान मटका सट्टापट्टीचे आकडे लिहून लोकांकडून पैसे घेवून लोकांना सट्टापट्टीचे आकडे लिहलेले कागद देवुन कल्यान वरली मटक्यावर हारजितचा जुगार खेळविताना मिळून आल्याने आरोपीचे पानठेल्याची झडती घेतली असता नगदी १३२०/-रू २) एक बॉल पेन ३) एक स‌ट्टापट्टी गुलाबी रंगाचा लीहलेला कागद असा एकुण १३२०/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (प्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापरखेडा येथील ठाणेदार पोनि, धनाजी जळक व त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा - मुख्याधिकारी संदीप बोरकर

Sat Jul 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्य शासनाची महिलांसाठीची महत्वकांक्षी असलेली माझी लाडकी बहीण योजनेचा समस्त महिलांसह कामठी शहर तसेच बिडगाव नगर पंचायत च्या महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासक संदीप बोरकर यांनी केले आहे. महिलांच्या आरोग्य ,पोषण आणि आर्थिक स्वावलंबणासाठी तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!