संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ग्रामपंचायत सचिव व कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
कामठी :- वाढता प्लास्टिक वापर हे पर्यावरणाला घातक असून वापर करण्यात आलेल्या प्लास्टिकचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे मत कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे कामठी तालुक्यातील कोराडी येथे आयोजित प्लास्टिक व्यवस्थापन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले तसेच गावस्तरावर प्लास्टिक संकलित करून योग्य पद्धतीने प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी एक प्लास्टिक युनिट उभारण्यात येणार आहे.तेव्हा त्या गावातील सरपंच व ग्रामसेवकाना माहिती होण्यासाठी कोराडी येथे ग्रामपंचायत सचिव व कर्मचाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेत गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, प्लास्टोरूट कंपनीचे अधिकारी कपिल, पंचायत विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, प्लास्टिक व्यवस्थापन बाबत यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष प्लांट वर कसे काम चालते याचे प्रात्यक्षिक पण दाखविण्यात आले. तसेच गावागावात ओला, सुका व प्लास्टिक विलगीकरण घराघरातून होण्यासाठी जनजागृती करण्याबाबत सुद्धा सूचना देण्यात आल्यात.