पवनी/भंडारा :-भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील पवनी नगर परिषद येथे अनेक समस्या चा डोंगर असल्याने सर्वच रोडवर ठीक – ठिकाणी रोड खोदले व सामान्य नागरिकांना साधा चालणे देखील जमत नसल्याने पक्षाच्या वतीने आज दिनांक 04/09/2024 ला घेराव करून त्वरित काम ची मागणी करण्यात आली.
भंडारा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पवनी नगर परिषद येथे नगर परिषद येथे प्रशासक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षा च्या वतीने पवनी शहरात गटार लाईनचे काम अनेक दिवसांपासून कासवगतीने सुरू आहे. गावातील मुख्य रस्ते, गल्ली बोळात खोदकाम करून बऱ्याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत ते खड्डे लगेच बुजवण्यात यावे.
मुख्य रस्त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी. गांधी गेट गांधी गेट पंचायत समिती वैजेश्वर घाट पर्यंत आझाद चौक चंडिका मंदिर बुधवारी पेठ पर्यंत गांधी गेट न.प. कार्यालय-नदीवरील पुलापर्यंत खोदकामामुळे नागरीकांना नाहकच त्रास सहन करावे लागत आहे. आजरी व्यक्तिला दवाखान्यात गाडी, रिक्शाने नेतांना फारच त्रास होतो. कित्येक ठिकाणी अपघात होतात. गाडयांचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच
घरकुल योजना अनेक लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला परंतू त्यांचे हप्ते वेळेत मिळत नसल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही लोक भाडयाने राहतात. काही पडक्या घरात आश्रयाने आहेत. पावसाळयाच्या दिवसात किती त्रास होत असेल याची जाणीव ठेवून त्यांचे हप्ते वेळेत दयावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा देखील इशाराही देण्यात आला.
हे घेराव भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यात प्रामुख्याने तालुकाध्यक्ष कुणाल पवार ,शहराध्यक्ष निखिल गोंडाने,मयूर जनबंधु,शाहिल शेख,राकेश हटवार, घनश्याम वंजारी,मोहम्मद शमी पटेल, यशवंत मोहरकर,रिजवान शेख,शाहिल शेख ,अरबाज खान, भगवान जनबंधु,मेशुब पठाण,राजीव बेग,विष्णुदास तलमले ,ज्ञानेश्वसर नागपुरे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.