आयएनएस राजली येथे नौदल वैमानिकांची पासिंग आऊट परेड

– एसएलटी अनामिका बी राजीव यांनी ‘प्रथम महिला नौदल हेलिकॉप्टर वैमानिक ’ म्हणून पदवी केली प्राप्त

तमिळनाडू मधील अराक्कोनम येथील नौदल हवाई तळ – आयएनस राजली येथे, 7 जून 24 रोजी 102 व्या हेलिकॉप्टर रूपांतरण अभ्यासक्रमाच्या 102 व्या तुकडीची पदवी पूर्ण झाल्यानिमित्त तसेच बेसिक हेलिकॉप्टर रूपांतरण अभ्यासक्रमाच्या (BHCC) 4 थ्या तुकडीचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानिमित्त पासिंग आऊट परेड आयोजित करण्यात आली होती. ईस्टर्न नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या हस्ते 3 बेसिक हेलिकॉप्टर रूपांतरण अभ्यासक्रमामधील तीन अधिकाऱ्यांसह 21 अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित “गोल्डन विंग्स” पुरस्कार प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त, 4 बेसिक रूपांतरण अभ्यासक्रमाच्या तीन अधिकाऱ्यांनी त्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

भारतीय नौदलाची लैंगिक समावेशकता आणि महिलांसाठी करिअरच्या संधींचा विस्तार करण्याप्रति वचनबद्धता अधोरेखित करत एसएलटी अनामिका बी राजीव यांनी ‘प्रथम महिला नौदल हेलिकॉप्टर पायलट’ म्हणून पदवीधर बनत इतिहास रचला आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशातील पहिले नौदल अधिकारी लेफ्टनंट जामयांग त्सेवांग यांनीही हेलिकॉप्टर पायलट म्हणून यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली.

प्रशिक्षणार्थी पायलटसाठी फ्लाईंग ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थी पायलटला दिला जाणारा FOCinC, ईस्टर्न नेव्हल कमांड फिरता चषक लेफ्टनंट गुरकिरत राजपूत यांना प्रदान करण्यात आला.

मूलभूत विषयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थीला दिले जाणारे सब लेफ्टनंट कुंटे मेमोरियल बुक पारितोषिक लेफ्टनंट नितीन शरण चतुर्वेदी यांना प्रदान करण्यात आले. एकूणच गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थीला दिला जाणारा केरळच्या राज्यपालांचा फिरता चषक लेफ्टनंट दीपक गुप्ता यांना प्रदान करण्यात आला.

आपल्या देशाच्या समृद्ध वारशात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या हेलिकॉप्टर प्रशिक्षण संस्थेने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल तसेच मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या राष्ट्रांच्या 849 वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. अरक्कोनम येथील आयएनएस राजली स्थित हेलिकॉप्टर प्रशिक्षण विद्यालय सध्या कमोडोर कपिल मेहता यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे तर हेलिकॉप्टर प्रशिक्षण विद्यालयाचे कमांडर म्हणून कमांडर अर्चेश काम पाहत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; `या` आमदारांना लागणार लॉटरी

Mon Jun 10 , 2024
  मुंबई :- देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लगेचच पदाची जबाबदारी स्वीकारत पुढील कामांना सुरुवात केली आहे. याच धर्तीवर रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या केंद्रातील नवनियुक्त मंत्रिमंडळाची आज दिल्लीत पहिली बैठक होणार आहे. तिथं दिल्ली दरबारी सत्तास्थापनेनंतर अनेक घडामोडींना वेग आलेल्या असतानाच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आता महाराष्ट्रातही सत्तेत असणाऱ्या महायुतीकडून नवा डाव खेळला जाणार असल्याचं पाहायला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com