राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; `या` आमदारांना लागणार लॉटरी

 

मुंबई :- देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लगेचच पदाची जबाबदारी स्वीकारत पुढील कामांना सुरुवात केली आहे. याच धर्तीवर रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या केंद्रातील नवनियुक्त मंत्रिमंडळाची आज दिल्लीत पहिली बैठक होणार आहे. तिथं दिल्ली दरबारी सत्तास्थापनेनंतर अनेक घडामोडींना वेग आलेल्या असतानाच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आता महाराष्ट्रातही सत्तेत असणाऱ्या महायुतीकडून नवा डाव खेळला जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जणार आहे. गेल्या कैक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाणार असून, विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीने सरकारने ही तयारी केल्याचं समजत आहे.

कोणाला मिळणार संधी?

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप अशा तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. याशिवाय काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता नेमकी कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

प्राथमिक माहितीनुसार विभागीय आणि जातीय संतुलन राखत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसह एकूण राज्य मंत्रिमंडळाची संख्या 43 इतकी असू शकते. सध्या हा आकडा 29 मंत्री इतका आहे. म्हणजे येत्या काळात आणखी 14 जणांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मंत्रिमंडळ विस्ताराशिवा. विविध महामंडळं आणि समित्यांसाठीच्या नियुक्ती प्रक्रियाही येत्या काळात पूर्ण केल्या जाणार सांगण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार देवेंद्र भुयार रुग्णांसाठी ठरत आहे देवदूत ! 

Mon Jun 10 , 2024
– १४ वर्षाच्या चिमुकल्यावर मुंबई येथे शस्त्रक्रिया !  – २ लक्ष ४० हजार रुपयांची मोफत शस्त्रक्रिया, पोटे कुटुंबाला मिळाला दिलासा !  वरूड :- मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत असून रुग्णसेवेला प्राधान्य देऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com