पुढील दोन दिवस कामठी तालुक्यातील दारू विक्रीला बंदी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- रामटेक लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल ला होणार आहे.तर 4 जून ला मतमोजणी होणार आहे.ही निवडणूक खुल्या ,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी उद्या 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून मतदानाच्या दिवशी 19 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण दिवस रामटेक लोकसभा मतदार संघातील पूर्ण विधानसभा मतदार संघात तसेच कामठी तालुक्यातील ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्यविक्री करण्यास मनाई राहणार असून 4 जून मतमोजणी च्या दिवशी सुद्धा मद्यविक्रीस बंदी राहणार असून या दिवशी कोरडा दिवस ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जारी केले आहे.या आदेशाचे उल्लंघन कारणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

– फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाणी नाही तर मतदान नाही, रमाई नगरातील नागरिकांचा इशारा, सहायक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

Tue Apr 16 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागरी समस्या बाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे रमाई नगरातील नागरिकांनी मतदाना वर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले आहे. प्रभाग 15 तील रमाई नगरात अनेक वर्षापासुन मुलभुत सोईंचा अभाव आहे, तसेच येथील जवळपास 60-70 घरांना पाणी पुरवठा होत नाही, स्थानिक भाजपा नगरसेविका संध्या रायबोले यांनी न प प्रशासनाला अनेकदा निवेदन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com