पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

– 10 जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठात आयोजन

गडचिरोली :-  जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जुलै 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ येथे सकाळी 11 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये कंपन्या, महामंडळे उपस्थित राहणार आहेत. तरी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि. 10 जुलै 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र.07132-222368 यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे

Fri Jul 5 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जून महिना कोरडा गेल्यानंतर दमदार व पुरेसा पाऊस नसूनही तुरळक पावसाच्या भरवशावर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यानी खरिपातील सोयाबीन,धान,तूर,मूग उडीद,कापूस आदी पिकांची पेरनी केली.परंतु कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची गरज असताना पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळा कडे लागल्या आहेत. गतवर्षी खरिपातील नापिकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी तरी चांगला पाऊस पडून पिके चांगली येतील अशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com