संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे विविध कारणांमुळे बेवारस अवस्थेत पडून असलेल्या वाहनांची संख्या ही 10 च्या घरात आहे.काही वाहने अपघातग्रस्त असून काही वाहनांच्या मालकांनी दंड म भरल्यामुळे पोलीस स्टेशन च्या ताब्यात आहेत.तसेच चोरीच्या घटना समोर आल्या नंतर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचाही समावेश आहे.या पाश्वरभूमीवर ज्या नागरिकांची वाहने जुनी कामठी पोलीस ठाण्यात जमा असतील त्यांनी त्वरित आपल्या वाहनांची ओळख पटवून संपूर्ण कागदपत्रांसह पोलीस स्टेशन ला हजर राहावे असे आवाहन जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे तसेच पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी केले आहे.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर संबंधित नागरिकाना त्यांची वाहने सुरक्षितरित्या परत दिली जातील. वाहनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या दुचाकी वाहनांची सुटका करून घ्यावी अन्यथा नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते असेही पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी स्पष्ट केले आहे.