आक्सिजन देणारे वृक्ष हे पृथ्वीची शोभा आहे, प्रत्येकाने वृक्ष लावली पाहिजे – पोनि पाटील

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामगार कल्याण केंद्र कन्हान द्वारे पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण

कन्हान :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र. एक नागपुर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान द्वारे पोलीस स्टेशन इमारत परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लाऊन वृक्षारोपण कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

कामगार कल्याण केंद्र कन्हान द्वारे सहाय्यक कल्याण आयुक्त मा. नंदलाल राठोड, गटअधिकारी प्रतिभा भाकरे यांचा मार्गदर्शनात शुक्रवार दि.(१२) जुलै ला कन्हान पोलीस स्टेशन नवीन इमारत परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक उमेश पाटील, प्रमुख पाहुणे रिता बर्वे, युवा पत्रकार ऋषभ बावनकर आदिंच्या हस्ते विविध प्रकार चे वृक्ष लावुन वृक्षरोपन करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी वृक्ष हे मनुष्याला अत्यंत महत्वाची गरज नैसर्गिक आक्सीजनचा पुरवठा करित असुन पृथ्वीची शोभा आहे, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात दरवर्षी वृक्ष (झाडे) लावली पाहिजे असे नागरिकांना आवाहन केले. जीवन जगण्यासाठी आवश्यक हवा आणि प्राणवायु आपल्याला वृक्षा पासुनच मिळतो असे रिता बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रंजना पवनीकर हयांनी केले. कार्यक्रमास पोलीस हवालदार नरेश श्रावणकर, अमोल नागरे , दिपक कुंभलकर, ओम यादव महिला कर्मचारी नालंदा पाटील, प्रेमा कावळे सह नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान नदी पुलावरून पडलेल्या गाईला सर्प मित्रांनी दिले जीवनदान

Sat Jul 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- ब्रिटिश कालीन जुन्या कन्हान नदी पुलावरून खाली पडलेल्या गाईला सर्प मित्र मंगेश मानकर आणि त्याचा सहका-यानी नदीतुन वर बाहेर काढुन दवाखान्यात नेऊन उपचार करित आदर्श जीवदया केंद्र लकड़गंज नागपुर येथे दाखल करून त्या गाईला जीवनदान दिले. कन्हान नदीवरील नविन पुलाचे उद्घाटन झाल्या नंतर ब्रिटिश कालीन जुन्या पुलावरुन कामठी नागपुर ला जाणा-या फक्त सत्रापुर येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com