इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत 14 मार्च रोजी मेळावा

यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ येथे दि.१४ मार्च रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सदर मेळाव्याला पालकमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.

मेळाव्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांचे मनोगत देखील होणार आहे. या मेळाव्याकरिता सामाजिक न्याय भवन येथे जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक संचालक मंगला मून यांनी केले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अर्ज करण्याचे आवाहन

Tue Mar 12 , 2024
यवतमाळ :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध संवर्गातील पात्र व्यक्तींना विविध लघु व मध्यम व्यवसायांकरीता सहाय्य करण्यासाठी योजना राबविण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत 50 टक्के अनुदान व बिजभांडवल योजना कार्यान्वीत असून या दोन्ही कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. आता केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री अनुसूचित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com