महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध संवर्गातील पात्र व्यक्तींना विविध लघु व मध्यम व्यवसायांकरीता सहाय्य करण्यासाठी योजना राबविण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत 50 टक्के अनुदान व बिजभांडवल योजना कार्यान्वीत असून या दोन्ही कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. आता केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेअंतर्गत अनुदान मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आलेली असून 50 टक्के अनुदान योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारापर्यंत 25 हजार रुपये अनुदान देय आहे. बिजभांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादेच्या तुलनेत जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान देय आहे.

या दोनही कर्ज योजनेअंतर्गत अनुदानामध्ये झालेल्या बदलाची नोंद घेवून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील जास्तीत जास्त पात्र ईच्छुक व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक माधुरी अवघाते यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी तहसिलदार महेश सावंत, नायब तहसिलदार आर. के. डिघोळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com