पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जागा हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर करावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

धुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत गावासंदर्भात बैठक

मुंबई :-  जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात भूसंपादनासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात बैठक झाली.

यावेळी आमदार मंजुळा गावित, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात भूसंपादनासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वॉटर ग्रीडमध्ये सोयगावचा समावेश करण्यासंदर्भात तपासणी करणार - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Thu Sep 29 , 2022
मुंबई :- औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याचा वॉटर ग्रीडमध्ये समावेश करण्यासंदर्भात अभ्यास करून व्यवहार्यता तपासण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सोयगाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com