यवतमाळ :- नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे वा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या नझूल जमीनीचे शर्थभंग नियमानुकूल करून नुतनीकरण करणे तसेच नझूल जमीनी बी मधून सत्ताप्रकार ए फ्री होल्ड भोगवटदार वर्ग एक करणेबाबत उपविभागीय कार्यालय, यवतमाळ येथे दि.27 व दि.28 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे वा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या नझूल जमीनीचे शर्थभंग नियमानुकूल करून नुतनीकरण्यासाठी संबंधिताने नझुल जागेचा मुळ भाडेपट्टा, मुळ हक्क नोंदणी, संपुर्ण खरेदी विक्री हस्तांतरण व्यवहार झालेल्या खरेदी खत, संपुर्ण फेरफार नक्कल, मुळ मिळकत पत्रिका, नझूल भूईभाडे भरणा केलेली पावती, नझूल शिट नकाशा असे कागदपत्र शिबिराच्यावेळी आणणे आवश्यक आहे.
नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे वा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या नझूल जमीनी बी मधून सत्ताप्रकार (फ्री होल्ड) भोगवटदार वर्ग एक करण्यासाठी संबंधित नझूलधारकाने नझूल जमिनीचे शर्थभंग नियमानुकुल करून नुतनीकरण आदेश, नझूल जागेचा मुळ भाडेपट्टा, मुळ हक्क नोंदणी, संपुर्ण खरेदी विक्री हस्तांतरण व्यवहार झालेल्या खरेदी खत, संपुर्ण फेरफार नक्कल, मुळ मिळकत पत्रिका, नझूल भूईभाडे भरणा केलेली पावती, नझूल शिट नकाशा आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.