– क्रांती दिन चिरायू होवो
नागपूर :- क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली. अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी. यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिन हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या भारतीय स्वातंत्र्य सेनानीने आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा सर्व क्रांतिवीरांना आदरांजली देण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने करण्यात आली तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे दंदे फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. पिनाक दंदे, एडवोकेट संकेत जोशी उत्तम संगीतकार, तबलावादक आणि त्याचबरोबर वकील (एल एल एम क्रिमिनॉलॉजी) यांनी भारतमाता पूजन केले. मुख्याध्यापिका प्राचार्या वंदना कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे रोप व मानचिन्ह देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शाळेत विशेष अतिथी म्हणून आलेली आले स्वरा ठेंगडी या विद्यार्थिनी ने शिवरायांचे जीवन चरित्र प्रभावी शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर संपूर्ण भारतीय संग्रामातील बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींची माहिती विद्यार्थ्यांसमोर सांगितली तिचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रांती दिन निमित्य गीताचे गायन केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका मृणाल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गिताने करण्यात आली.