नाबार्डद्वारा आयोजित ऍग्री क्लिनिक अँड ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम कार्यशाळेचे आयोजन

नागपूर :- राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था भारत सरकार यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या ऍग्री क्लिनिक अँड ऍग्री बिझनेस सेंटर या योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन नाबार्ड, नागपूर द्वारा शेतकरी प्रशिक्षण केंद्र, ऑफिस नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या योजनेमध्ये नवीन कृषी उद्योग प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ व अनुदान दिल्या जाते. या योजनेची संपूर्ण माहीती मिळावी व कृषी विस्तारामध्ये कृषी पदविका आणि पदवीधरांचा सहभाग वाढावा हा उद्देश ठेवून केंद्र सरकारने ही योजना विकसित केलेली आहे आणि ही योजना लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने नाबार्ड नागपूर चे जिल्हा कृषी प्रबंधक सचिन सोनोने यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या योजनेचे फायदे,अर्ज करण्याची प्रक्रिया याची संपूर्ण माहिती श्री सचिन सोनोने यांनी दिली तसेच योजनेचे स्वरुप व योजना कार्यान्वित करण्यासाठी बँकांची भूमिका यावर  रंजित लेंडे नोडल ऑफिसर नागपूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र मनोहरे जिल्हा कृषी अधीक्षक नागपूर यांनी कृषी विस्तारात योजनेची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन केले त्याचबरोबर या योजनेमध्ये स्मार्ट सारख्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी कंपन्यांमार्फत उत्तम दर्जाचे प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन कृषी उपसंचालक अरविंद उपरिकर यांनी केले व तसेच कृषी विज्ञान केंद्र नागपूरचे प्रमुख डॉ. आर के सिंग यांनी कृषी उदयोग वाढीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञान हस्तांतरण या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर बँक ऑफ इंडिया नागपूर येथील मुख्य शाखेचे आर्थिक साक्षरता सल्लागार राजीव उन्हाळे व इंडियन ओव्हरसिस बँकेचे आर्थिक साक्षरता सल्लागार गौरव तिजारे यांनी उद्योगाचे आर्थिक नियोजन व कर्ज प्रक्रिया व त्यावरील अनुदान या विषयावर मार्गदर्शन केले तसेच वरीष्ठ सहाय्यक चंदू नागपुरे यांनी शेती आणि माती यावर मार्गदर्शन केले.

योजनेअंतर्गत यशस्वी कृषी उद्योजक म्हणून पुढे आलेले भद्रा ऍग्रो कॉर्पोरेशनचे संचालक अश्विनकुमार कल्लावे यांनी आपली यशोगाथा त्यांच्या शब्दसुमनात व्यक्त केली त्याच बरोबर नागपूर सेंद्रिय शेती कंपनीचे संचालक गजानन गिरोलकर यांनी कृषी प्रस्तावातील त्रुटी व उपाययोजना याबद्दल आपला अनुभव व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम देशमुख तर आभार प्रदर्शन शिवाजी पतंगे यांनी केले.

NewsToday24x7

Next Post

WCL के कारण प्रदूषित हो रहीं नदियां

Thu Jan 25 , 2024
– HC ने जवाब देने का दिया अंतिम मौका  नागपुर :- नदियों के प्रदूषण को लेकर प्रशासन की लापरवाही और एक नदी के कारण अन्य नदियों के प्रदूषण होने तथा देशभर में इसके व्यपाक असर का हवाला देते हुए नरेश पुगलिया की ओर से हाई कोर्ट में जनहित याचिका दायर की गई. नदियों के पुनर्जीवन को लेकर राज्य सरकार द्वारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com