अमरदिप बडगे, प्रतिनिधी
अनेकांच्या घरात शिरले पाणी ; कुलरच्या मोटारीने घरात शिरले ला पाणी काढत आहेत
मुठीत जीव घेऊन करत आहेत प्रवास
गोंदिया :- सतत सुरु असलेल्या पावसाने आता जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील मोठा तलाव म्हणून सुर्याटोला स्थित बांध तलाव मागील पंधरवड्यात दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच पाऊस सुरु असल्याने या तालाचे पाणी आता रस्त्यावर येऊ लागले आहे. तसेच लोकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. लोक रात्र जागून घरात साचलेला पाणी कुलरच्या मोटारीने बाहेर काढत आहेत व भरपूर नागरिकांच्या सूर्या टोला रामनगर संपर्क देखील तुटलेला आहे. तर मोठ्या प्रमाणात बांधतलाचे पाणी रस्त्यावर आल्याने या पाण्यातून वाहन काढायचे कसे असा प्रश्न वाहनचालकांना असून तर जिल्ह्यातील धानपिक ही पाण्याखाली गेल्याने ती सडण्याची भीती निर्माण झाली आहे. नदीनाले ओसंडून वाहत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र जिल्हा प्रशासन सुस्तच असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हयात मागील तीन चार दिवसांपासुन पावचाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदी, नाले, तलाव, ओसंडून वाहत आहे. गोंदिया शहरातील सुर्याटोला परिसरातील बांध तलाव ओव्हर फ्लो होऊन या तलावाचे पाणी एकता कॉलनी, परमात्मा एक नगर परिसरात साचले. ही समस्या आता दरवर्षीचीच झाली असुन गुडघाभर पाण्यातुन या वॉर्डातील नागरिकांना आपले जीव मुठीत घेऊन ये-जा करवी लागते. यामुळे कधी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नगर परिषदेने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे वार्डातील नागरिकांमध्ये रोष व्याप्त असुन आमचा जीव गेल्यावर बांध तलावाची समस्या मार्गी लावणार का, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. शहरातील सुर्याटोला परिसरात बांध तलाव आहे. बऱ्याच वर्षांपासून या तलावाचे खोलीकरण आणि तलावाची पाळ उंच् करण्यात आली नाही. त्यामुळे सलग तीन-चार दिवस पाउल झाला की हा तलाव भरून जातो. तलाव ओव्हर फ्लो झाला की, तलावाचे पाणी एकता कॉलनी, परमात्मा एक नगर आणि सुर्याटोला परिसरात गुडघाभर पाणी साचते. सोमवारी रात्री आणि मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे बांध तलाव ओव्हर फ्लो झाल्याने सूर्या टोला परिसरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. तर एकता कॉलनी, परमात्मा एक नगर वॉर्डातील काही पाण्याखाली आले होते.