संदीप बलविर,प्रतिनिधी
बोरखेडी (रेल्वे) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
जनसेवा महिला बचत गट व ग्रा प बोरखेडी (रेल्वे) चा संयुक्त उपक्रम
नागपूर :- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घेतलेला स्त्री शिक्षणाचा वसा पूर्णत्वास नेला.याकरिता त्यांना समाजातील मनुवादी,रुढीवादी लोकांच्या शेण मातीचा मारा सहन करावा लागला तरी त्या मागे वळल्या नाही.यातून त्यांचा दृढ निश्चयच दिसून येतो. असेच निश्चय व संकल्प मनाशी बाळगून आपले ध्येय निश्चित करावे असे मार्गदर्शन बोरखेडी (रेल्वे) येथे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ग्रा प बोरखेडी (रेल्वे) चे सरपंच राजू घाटे यांनी केले.
गट ग्रा प बाेरखेडी रेल्वे व जनसेवा महिला बचत गट यांच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच राजुभाऊ घाटे अशाेक मानकर ग्रा पं सदस्य कमलेश मुन हरीश फंड देविकी इनवाते सचिव काकडे साहेब भाषकर मेहरकुरे गणेश पाटिल सुधाकर पानघाटे सावळा लस्करे जनसेवा महिला बचत गट अध्यक्ष सविता इरपाते गिता घाटे प्रतीभा ढाेके बबीता शंभरकर वनीता इरूटकर चंदा धुर्वे उषा कुंभरे हेमलता ढाेके रंजना ढुमने मिनाक्षी ढाेके अर्चना उईके तीर्वना ढाेके वैशाली डेगे व छाया तळस उपस्थित हाेत्या.