लिहीगावात वृद्धाची गळफास लावून आत्महत्या.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 कामठी ता प्र 13 : – स्थानिक  नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील लिहीगाव येथे एका वृदाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी साडेचार वाजता घडली असून प्रकाश किसन मेश्राम वय 59 असे मृत वृद्धाचे नाव आहे. नवीन कामठी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मृतक प्रकाश किसन मेश्राम वय 59 राहणार लिहीगाव हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे .आज कुटुंबातील पत्नी, मुलगा ,सून नागपूर येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले असता घरी कोणी नसल्याचे संधी साधून राहते घरी दोराने खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी साडेचार वाजता सुमारास सून व मुलगा घरी आले असता दार उघडले तर घरात प्रकाश किसन मेश्राम दोराने लटकलेल्या स्थितीत दिसून आला घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक आनंद पिल्ले सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले कुटुंबात सर्व काहीच सुरळीत सुरू असताना प्रकाश किसन मेश्राम यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. मृतकाचे मागे पत्नी ,एक मुलगा ,सून व चार मुली असा मोठा परिवार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com