अरोली :- चाचेर येथील समस्त ग्रामवासियांच्या सौजन्याने श्री शंकर देवस्थान मंदिर येथे जिल्ह्या भंडारा, तालुका साकोली मुक्काम पोस्ट सानगडी येथील भागवताचार्य ह भ प केशर मेश्राम यांच्या संचार सहित सुसंगित अखंड श्रीमद् भागवत व संत चरित्र कथा ज्ञानयज्ञ सप्ताह 21 फेब्रुवारीपासून सुरू असून उद्या 27 फेब्रुवारीला सकाळी सामुदायिक ज्ञान, हवनपूजा व गावातून राम धुन त्यानंतर भागवत प्रवचन व पोथी पूजा होणार आहे. 28 फेब्रुवारीला गोपाल काल्याचे किर्तनाने समारोप होणार आहे.
23 फेब्रुवारीला श्री शंकर देवस्थान कमिटी व अमन ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर आज 26 फेब्रुवारीला गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. उर्वरित दोन दिवसीय कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.