नवी दिल्ली :- काशी विश्वनाथ धाम आणि श्री महाकाल महालोक कॉरिडॉर प्रमाणे माँ कामाख्या कॉरिडॉर हा देखील ऐतिहासिक उपक्रम ठरेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका ट्विटच्या माध्यमातून नूतनीकरण केलेला माँ कामाख्या कॉरिडॉर नजीकच्या भविष्यात कसा दिसेल याची झलक सादर केली आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“माँ कामाख्या कॉरिडॉर हा ऐतिहासिक उपक्रम ठरेल अशी मला खात्री आहे.
अध्यात्मिक अनुभवाचा विचार केला तर याच्याशी संबंधित काशी विश्वनाथ धाम आणि श्रीमहाकाल महालोक यांचा कायापालट झाला आहे. यासोबतच पर्यटन वाढवणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.”