संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-गुरुवारला जाहीर झालेल्या वर्ग बारावीच्या निकालात सेठ केसरिमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत सुयश मिळविले आहे. विज्ञान शाखेत एकूण ३९८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्या पैकी ३८८विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान विभागाचा निकाल ९७.४८टक्के,वाणिज्य विभागात ३४८ पैकी २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ८१.३२ टक्के तर कला शाखेचा निकाल ४५.६८ टक्के लागला.कला शाखेत २३२ विद्यार्थ्यां पैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतून अभिषेक सिद्धार्थ डांगे सर्वप्रथम आला असून त्याला ८८.५० टकके,तर द्वितीय रोशनी परमानंद चावला ८३.८३ , शालिक राहुल मोडक ८३.१७. %गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेतून तनाश्री रुपेश बिसने हिला सर्वाधिक ९३%गुण मिळाले. बाली सिद्धी परवेश हिला ९२% तर रोहित विनोद जयस्वाल याला ९१.५०% गुण मिळाले.कला शाखेतून सिद्धी देवाजी लांजेवार हिला सर्वाधिक गुण मिळाले असून तिची टक्केवारी ७७.३३% तर द्वितीय क्रमांक तेजस पाटील ६९.८३ %गुण मिळाले ६८.१७% गुण मिळवून आकांक्षा यशवंत बारिये हिने तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हान,उपप्राचार्य प्रा डॉ सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक व्हि बी वंजारी यांनी केले आहे.