अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. अभ्यास केंद्राच्यावतीने दिनांक 08 ते 14 एप्रिल, 2023 या दरम्यान समता सप्ताह समारोह 2023 निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 08 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.30 वा. 18 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्र येथे करण्यात आले आहे. उद्घाटन समारभाला उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले उपस्थित राहणार असून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी व अधिसभा सदस्य प्रताप अभ्यंकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 08 ते 11.00 दरम्यान भौतिकशास्त्र विभाग येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर व शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे चरित्र व कार्यावर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाला भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, रसायनशास्त्र विभागातील डॉ. जागृती बारब्दे व डॉ. मनिषा कोडापे यांची उपस्थिती लाभणार आहे. दुपारी 12.00 वाजता ‘महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंंबेडकर व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन व कार्य’ या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार असून स्पर्धेचे संयोजक म्हणून परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील काम पाहतील. दुपारी 3.30 वाजता डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे अपूर्वा सोनार ह्रा ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व व्य.प. सदस्य तथा सीताबाई कला महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5.00 वा. ‘डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व भारतीय कृषी क्षेत्र’ या विषयावर कृषीतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगाळे यांचे व्याख्यान होईल.
दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वा. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, पंचवटी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इर्विन पर्यंत समता दौड होईल. समता दौडचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या शुभहस्ते होणार असून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विद्यापीठ व्य.प. सदस्य डॉ. रविंद्र कडू, अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गावंडे यांची उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी 04 वा. डॉ. के.जी. देशमुख सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे यांची उपस्थिती लाभणार आहे.
दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 4.00 वा. विद्यापीठ अधिसभा सभागृह या ठिकाणी ‘महात्मा फुले यांची तत्व मिमांसा’ या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. उमेश बगाडे हे अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील. व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. येवले भूषविणार असून प्र-कुलगुरू डॉ. वाडेगांवकर, अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गवई व श्री शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. संजय खडसे उपस्थित राहतील.
दि. 13 एप्रिल रोजी दुपारी 4.00 वा. डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे ’भारतीय राज्यघटना : एक जीवंत गतीमान करार’ या विषयावर नागपूरचे डॉ. वेदप्रकाश मिश्रा विशेष व्याख्यान देतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले भूषविणार असून प्र-कुलगुरू डॉ. वाडेगांवकर व विद्यापीठ व्य.प.सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी उपस्थित राहतील. सायं. 5.30 वा. कवि संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थान महिला महाविद्यालय, चांदुररेल्वेचे प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर भूषवतील. कवि संमेलनामध्ये अशोक इंगळे, भास्कर पाटील, कैलास वानखडे, डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. कमलाकर पायस, गजानन बनसोड, दिपक वानखडे, संजय शेजव, अजय खडसे, अण्णा वैद्य, चंदु पाखरे, विक्रांत मेश्राम, सागर जाधव, गजानन लोहवे, विजित कांबळे, महेश हंबरडे, अनिल काळबांडे, विलास भवरे, युवराज मानकर, चरणदास सोळंके आदी कविंचा सहभाग राहणार आहे.
दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र, विद्यापीठ परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इर्विन दरम्यान समता रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते होणार असून प्र-कुलगुरू डॉ. वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गवई, माजी व्य.प. सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. मनिष गवई उपस्थित राहतील. सकाळी 10.00 वा. इर्विन चौक येथे संविधान उद्देशिका व ग्रंथ वितरण कार्यक्रम संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, खासदार नवनीत राणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.