संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- आगामी गणेशोत्सवा दरम्यान शहरात कायदा सुव्यवस्था राहावी याकरिता नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रूट मार्च करून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले . या रूट मार्च ची सुरुवात नवीन कामठी ठाण्याचे ठाणेदार संतोष वैरागडे यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी दुय्यम निरीक्षक कमलाकर गड्डीमे पोलीस उपनिरीक्षक शाम वारंगे ,गीता रासकर ,नितीन पवार, एस मातिंगे सह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. रूट मार्च नवीन कामठी पोलीस स्टेशन, इस्माईल पुरा, वारीस पुरा,बुनकर कॉलनी ,येरखेडा दुर्गा चौक, शारदा चौक, पाणी टाकी चौक ,रामकृष्ण लेआउट ,मरार टोळी, पंकज मंगल कार्यालय चौक ,पारसी पुरा ,जयभीम चौक, लकडगंज चौक ,गवलीपुरा ,रमनगर ,कामगार नगर ,जयस्तंभ चौक मार्गे नगर ब्राह्मण करीत नवीन कामठी पोलीस ठाण्यात समापन करण्यात आले.
रूट मार्च दरम्यान ठाणेदार संतोष वैरागडे यांनी नागरिकांची संवाद करून आगामी गणेश उत्सवा दरम्यान शासनाचे नियम पाळून आपण शहरात कायदा सुव्यवस्था व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले पोलिसांच्या रूट मार्चला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला दरम्यान जुनी कामठी पोलीस विभागातर्फे सुद्धा पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मुख्य उपास्थितीत रूट मार्च कढण्यात आला होता याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यासह आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.