महाशिरात्रीच्या दिवशी उपवासाच्या फराळ व खोव्याच्या जिलेबीतून अनेकांना विषबाधा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाने यावर्षीसुद्धा महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर कामठी शहरातील शिवभक्तानी उपवासातुन फराळ तसेच खोव्याच्या जिलेबीचा आस्वाद घेतला.मात्र कामठी शहरातील 30 च्या जवळपास नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून या विषबाधेला बळी पडलेले कामठी छावणी परिषद परिसर तसेच येरखेडा व कामठी शहरातील रोगीना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये कामठी नगर परिषद चे कर्मचारी प्रदीप भोकरे व त्यांच्या मातोश्री चा समावेश आहे.

प्राप्त माहीती नुसार विषबाधा झालेल्या बहुतेक नागरिकांनी फराळ व खोव्याची जिलेबी ही कामठी शहरातील एका नामवंत हॉटेल मधून खरेदी केल्याचे सांगण्यात येते .विषबाधा झालेले छावणी परिषद परिसर रहिवासी आठ रुग्ण सुखरूप घरी पोहोचले आहेत तर येरखेडा येथील एकाच कुटूंबातील पाच रुग्ण हे लाईफ लाईन हॉस्पिटल तसेच प्रदीप भोकरे व त्याच्या मातोश्री आदी आशा हॉस्पिटल सह इतर खाजगी रुग्णालयात अजूनही उपचारार्थ दाखल आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक महिला दिन के उप्लक्ष मे विविध क्षेत्रो मे काम करने वाले महिलाओ का सम्मान विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री सम्मानित करेंगे

Sun Mar 10 , 2024
नागपूर :-अखिल भारतीय हिंदी संस्था संघ ,नई दिल्ली , महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (विदर्भ प्रांत ) , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हिंदी विभाग, द्वारा आयोजित जागतिक महिला दिवस सम्मान समारोह दि ११ मार्च २०२४ शाम ५.३० बजे आयोजित किया गया है. इस कार्यक्रम के मुख्य अतिथी  विजयालक्ष्मी बिद्री भा.प्र. से , विभागीय आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com