बखारी डुमरी रोड च्या नहरात शेतमजुराचा मुत्यु..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – बखारी येथील शेतमजुर मातीने भरलेले हाथपाय धुत असताना पाय घसरून बखारी डुमरी रोड वरील नहरात पडल्याने शेतमजुर शिवदास पुरेना याचा घटनास्थळीच आकस्मिक मुत्यु झाल्याने त्याच्या परिवारास शासमाने आर्थिक मदत करण्याची मागणी बखारी गावकरी व शेतक-यांनी केली आहे.

शुक्रवार (दि.१४) ऑक्टोबंर ला बखारी गावात राहणारा शेतमजुर शिवदास भरतलाल पुरेना (गोसा वी) वय ४५ वर्ष राह. बखारी हा सकाळी गावातील नामदेव बाझनघाटे यांच्या शेतात महिला शेतमजुरासह निदना च्या कामा करिता गेला होता. शेतातील मातीने हाथ पाय भरल्याने दुपारी ३ वाजता बखारी डुमरी रोड वरील दामाजी सहारे यांचे शेताजवळ च्या नहरात गेला असता मातीने भरलेले हाथपाय धुत असताना पाय घसरून अचानक खाली पडला. तेथे तो पडुनच राहीला. काही वेळाने गावातील व्यकती ला तो नहरात पडुन दिसल्याने बखारी च्या पोलीस पाटील नरेंद्र पांडे व सरपंच नरेश ढोणे हयाना बोलावुन पाहीले तर तो मृत अवस्थेत दिसल्याने ही माहीती पोलीस पाटीलानी पारशिवनी पोलीसा दिल्याने घटनास्थळी पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोहवा गंगाप्रसाद वरकडे, प्रफुल जगनाडे सहकर्मचा-यास पोहचुन शिवदास पुरेना चा मृतदेह पारशिवनी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेद ना करिता नेण्यात आला. पारशिवनी पोलीसानी मृत काचा साळा ऋषीकेश माडवे यांच्या बयाना वरून पोस्टे ला मर्ग दाखल केला आला आहे.

बखारी येथील शेतमजुर शिवदास पुरेना यांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने गावातील शेतात मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करित होता. त्याला फिट (मिरगी) कधी कधी येत होती. नहरात हाथपाय धुताना पाय घसरल्यावर त्यास फिट येऊन सुध्दा तो खाली पडुन मुत्यु पावला असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु त्याच्या मागे मंद बुध्दी पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार असल्याने या परिवाराचा पालनपोषण करणारा शिव दास पुरेना चा नहरात पडुन आकस्मिक मुत्यु झाल्याने पेंच पटबंधारे विभागाने व शासनाने मुतकाच्या परिवा रास आर्थिक मदत करावी. अशी मागणी बखारी सरपंच नरेश ढोणे हयानी ग्रामस्थाच्या वतीने केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोळसा खदान जि प शाळे जवळुन दगडी कोळसा व मारूती सुजुकी चोरी.

Fri Oct 14 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर तीन जिल्हा परिषद शाळे जवळुन दोन आरोपींनी दगडी कोळसा व मारूती सुजुकी सह एकुण ६७,४४० रु. मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१०) ऑक्टों बर ला वेकोलि सुरक्षा रक्षक दुपारी सेकंड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights