संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या दरम्यान “संविधान सन्मान सप्ताहा” ला नागपूर शहराच्या विविध भागात शुभारंभ

नागपूर :- संयुक्त रिपब्लिकन आघाडीची नुकत्याच झालेल्या 11 नोव्हेंबरला बैठक संपन्न झाली. त्या सभेत नागपूर शहराविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार संयुक्त रिपब्लिकन आघाडी येत्या 19 ते 26 नोव्हेंबर या दरम्यान नागपूर शहराच्या विविध भागात संविधान सन्मान सप्ताह राबविणार असल्याची माहिती दिनेश गोडघाटे यांनी पत्र परिषदेत पत्रकांराना दिली. पत्रपरिषदे दरम्यान संयुक्त रिपब्लिकन आघाडी तर्फे बोलतांनी हिंदुत्ववाद मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसते. या देशांमध्ये ज्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही असलेली घटना, संविधान दिले आहे. त्याच संविधानाची सध्याची परिस्थिती मध्ये पायमल्ली करून अवहेलना व संविधानाचा तोडमोड होत आहे. संविधाना मुळेच सर्वांना न्याय, सन्मान हक्क, शिक्षण, नोकरी मिळाल्या असे असताना सुद्धा या देशाची घटना बदलविण्याचे षडयंत्र सुरू आहे. रिपब्लिकन आंबेडकर जनतेला एकीकृत करणे, संविधानाविषयी जागृत करण्यासाठी, रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी नागपूर शहरांमध्ये ही संविधान सन्मान रॅली, इंदोरा चौक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे येथून सकाळी १० वाजता 19 नोव्हेंबर ला पुष्पहार घालून सुरुवात होईल व समारोप संविधान चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवसी दुपारी १ वाजता संविधान रॅलीचा समारोप करण्यात येईल या रॅलीमध्ये सुमारे पाचशे महिला व पुरुष सहभागी होणार असल्याची माहिती दिली. तसेच नागपूर शहराच्या विविध प्रश्नांवर संयुक्त रिपब्लिकन आघाडी आंदोलन करणार ओसीडब्ल्यू पाण्याचा प्रश्न, 24 बाय 7, विजेचा प्रश्न, झोपटपटी यांना मालकी हक्काचे पट्टे, कॉर्पोरेशन व करोना वाढीव कर, वकिलांची नोटीस फी, इत्यादी प्रश्नावर येणाऱ्या दिवसात आंदोलन करतील असे सुद्धा यावेळी सांगितले. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांसोबत कुठलाही समझोता अथवा युती किंवा गटबंधन करणार नाही. असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिनेश गोडघाटे यांनी दिली. संयुक्त रिपब्लिकन आघाडी स्वतंत्रपणे समविचारी पक्षांना सोबत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवतील अशी माहिती दिली. यावेळी पत्र परिषदेमध्ये संयुक्त रिपब्लिक आघाडीचे कार्यकर्ते अमृत गजभिये, कैलास बोंबले, दिनेश अंडरसहारे, निरंजन वासनिक, राहुल मून, दिनेश गोडघाटे, प्रकाश कुंभे, बाळूमामा कोसमकर, अशोक बोंदाडे, विश्वास पाटील, शेषराव गणवीर, राज सुखदेवे, अशोक भिवगडे, डॉ.चरणदास जनबंधू, रत्नमाला गणवीर, कुंदा जांभुळकर, नीलिमा डंबारे, रामदास गजभिये, डॉ.मनोज मेश्राम, गोपीचंद अंभोरे, सुरेश बोंदाडे, सुधाकर टवळे, सुनील इलमकर, अशोक निमसरकर, मोरेश्वर दुपारे, निलेश टेंभुर्णे, सुदर्शन मून, अनिल मेश्राम, राजू फुलके, सुधीर नारनवरे, माणिक लाल बांबोर्डे यावेळी उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे स्वच्छता, रस्ता, रस्ता दुभाजकलगतची धुळ होते संकलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाचा पुढाकार  

Fri Nov 18 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनने स्वच्छता करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत तीन मशीन घेण्यात आल्या असुन जो कचरा मानवी प्रयत्नांनी स्वच्छ करता येत नाही तो स्वच्छ करण्याचे काम या व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीन करीत आहेत. मनपा स्वच्छता विभागामार्फत सर्व रस्ते झडाईद्वारे नियमित स्वच्छ करण्यात येतात. मात्र यातील काही कचरा इतक्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!