नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २९/०६/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पारडी, कळमना आणि वाठोडा नागपुर च्या हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे गणेश प्रितमलाल बोरकर, वय ४० वर्ष रा. गिरजानगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेट्स, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक २९/०६/२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला करीता, नमुद आदेशाची बजावणी करून आरोपीस नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
गणेश प्रितमलाल बोरकर, विरुद्ध पो. ठाणे पारडी, कळमना व वाठोडा नागपूर शहर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे लैंगीक छळ करणे, दुखापत करण्याच्या तयारी करून नंतर अतिक्रमण करणे, प्राणघातक हल्ला करणे, विनयभंग करण्याच्या उददेशाने महिलेवर गुन्हेगारी प्रवृत्तीचा हल्ला करणे, शांतता भंग करण्याच्या उददेशाने हेतुपुरस्सर अपमान करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, अश्लिल भाषेत शिविगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अग्नी शस्त्र आणि प्राणघातक शस्त्रासह घेवुन फिरणे, अमली पदार्थ विकणे, अवैधरित्या दारू विक्री करणे, अवैध ताबा येणे, मनाई व हदपार आदेशाचे उल्लघन करणे, अशाप्रकारचे मालमत्ता आणि शरीराविरुध्द गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरुध्द पो. ठाणे कळमना व पारडी यांनी सन २०१४, २०१८ मध्ये १०७, ११६(३), ११०, ११०(३) (ग) १३ अन्य प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीपण, त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने, पोलीस उप आयुक्त, परि क ५. नागपूर शहर यांनी दोन वर्षाकरीता नमुद इसमास हदपार करण्यात आले होते. सदर इसमाने सदर बंधपत्राचे उल्लंघन करून पो. ठाणे पारडी व वाठोडा नागपूर शहर हद्दीत विनयभंग करण्याच्या उदद्देशाने महिलेवर गुन्हेगारी प्रवृत्तीचा हल्ला करणे, लैंगीक छळ करणे, दुखापत करण्याच्या तयारी नंतर घर अतिक्रमण करणे, प्राणघातक हल्ला करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपरस्सर अपमान करणे, जीव मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, प्राणघातक शस्त्रानिशी फिरणे, अवैधरित्या दारू विक्री करणे, मनाई आदेशाचे उपकरणे, अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नाम गणेश प्रितमलाल बोरकर, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ५, याचे मार्गदर्शनाखाली सपोआ कामठी विभाग, व पो. नि. मनोहर कोटनाके, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) व पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रकटीकरण शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे एम. पी. डी. ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये, स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश पारीत करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिले त्याअन्वये वर नमुद इसमा विरुध्द स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.