सर्वांना न्याय देणारा, सर्वसमावेश अर्थसंकल्प – जयदीप कवाडे

– केंद्र सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन

मुंबई/नागपुर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मल्ला सीतारामन यांनी आज सहावा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. विविध घोषणा यात करण्यात आल्या आहेत. करात सवलत, आत्मनिर्भर भारत, लघुउद्योगांना पाठबळ, वंचित घटकांना प्राधान्य, उद्योग आणि शेतीसाठी पायाभूत सुविधा अशा अनेक विचार करण्यात आला आहे. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारचा अर्थसंकल्प सर्वांना न्याय देणार, सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, सध्या देशात काय विश्वात काय अर्थकारणाच्या दृष्टीने सर्वत्र भांबावलेली पिरस्थिती असतानाही एक चांगला अर्थ संकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला आहे. या अर्थ संकल्पात करदात्या श्रीमंत, मध्यमवर्गापासून तर सर्व सामान्य यांच्या पर्यंत सर्वांसाठीच आकर्षक घोषणा केल्या आहेत. शेतकरी, महिला बचत गट, वंचित घटक, बेरोजगार युवक व उद्योजकांसाठी केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी पुढच्या लोकसभेत निवडणूक जिंकून मोदी सरकार पूर्ण करण्याचा निर्धार करीत आहे. हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा असुन गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ण करणारा आहे. समृद्ध, समर्थ आणि प्रत्येक क्षेत्रात संपन्न भारत बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या अर्थसंकल्पातून दिसून आल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.

शेतकरी, युवक उद्योजक, गरीब मध्यमवर्गीय महिला अशा सर्व समजाघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकनारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला. मोदीजींचा सबका साथ, सबका विकास हा मंत्र पुढे नेणारा आणि भारताला विकसित देश करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे, जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग खिलाडियों को सरकारने देनी चाहिए शिष्यवृत्ती - मेधा सोमैया की मांग

Fri Feb 2 , 2024
– विशेष ओलंपिक का समापन नागपुर :- सरकारद्वारा दिव्यांग बच्चों के लिए विभिन्न खेल प्रतियोगिताएं आयोजित की जाती हैं। प्रतियोगिता होने के बाद सरकार इन बच्चों पर पर्याप्त ध्यान नहीं दे रही । मानसिक रूप से विकलांग और अन्य विकलांग एथलीटों के लिए प्रतियोगिताएं आयोजित कर के सर्वश्रेष्ठ एथलीटों का चयन किया जाए और उन्हे शिष्यवृत्ति मिलनी चाहिए एैसी मांग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com