वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात 500 अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असे म्हणणे चुकीचे आहे. मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिर्डी येथे 24 मार्च पासून 'महापशुधन एक्स्पो' चे आयोजन

Wed Mar 22 , 2023
नाशिक : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्स्पो 2023’ चे आयोजन 24 ते 26 मार्च, 2023 दरम्यान करण्यात आले आहे. देशातील 13 राज्यांतील पशुधन बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडित बाबींसाठीच्या उत्पादनांचे स्टॉल सुमारे 46 एकराच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार आहेत. 65 प्रकारच्या विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com