नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कलम 370 आणि 35(अ) रद्द करण्याच्या संसदेच्या 5 वर्षे जुन्या निर्णयाचे स्मरण केले आणि हा अविस्मरणीय क्षण असल्याचा उल्लेख करून याद्वारे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख मध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची नांदी झाल्याचे नमूद केले.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले:
“भारताच्या संसदेने कलम 370 आणि 35(अ) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याला आज आपण 5 वर्षे पूर्ण करत आहोत, जो आपल्या देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे. जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नवीन पर्वाची ही नांदी होती. संविधान बनवणाऱ्या महापुरुषांच्या आणि विदुषींच्या दृष्टिकोनानुरूप संविधानाची अंमलबजावणी या तिन्ही ठिकाणी खऱ्या अर्थाने करण्यात आली. हे कलम रद्दबातल ठरवल्याने विकासाच्या फळांपासून वंचित राहिलेल्या महिला, तरुण, मागास, आदिवासी आणि उपेक्षित समुदायांना सुरक्षितता, सन्मान आणि संधी मिळाली. त्याचबरोबरीने, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून ग्रासलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याची खातरजमा करण्यात आली.
मी जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या लोकांना आश्वासन देतो की आमचे सरकार त्यांच्यासाठी काम करत राहील आणि आगामी काळात त्यांच्या आकांक्षा पूर्ण करेल.”
Today we mark 5 years since the Parliament of India decided to abrogate Articles 370 and 35(A), a watershed moment in our nation’s history. It was the start of a new era of progress and prosperity in Jammu and Kashmir, and Ladakh. It meant that the Constitution of India was…
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2024