नागपुर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ भारत दौरा करत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून ही यात्रा तेलंगणा राज्यात पोहचली आहे. काल ( १ नोव्हेंबर ) ही यात्रा हैदराबाद शहरात होती. यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही सामील होत आहेत. त्यातच राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा तेलंगणातील यात्रेत सामील झाले होते. मात्र, यात्रेदरम्यान राऊत यांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
‘भारत जोडो यात्रे’त सामील झाल्यानंतर नितीन राऊत यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे ते खाली पडले आणि उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच, हात आणि पायालाही दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. नितीन राऊत यांना तत्काळ उपचारासाठी हैदराबादमधील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.