नागपूर :- नागपुरातील निकी बारापात्रे आणि संजना जोशी खासदार क्रीडा महोत्सवातील सायकलिंग स्पर्धेत अव्वल ठरले. रविवारी (ता.21) सकाळी पार पडलेल्या सायकलिंग स्पर्धेत 21 वर्षाखालील मुले आणि मुलींमध्ये निकी व संजनाने बाजी मारली. दीक्षाभूमी जवळील साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे चौकातून सायकलिंग स्पर्धेला सुरूवात झाली.
21 वर्षाखालील मुलांच्या गटात निकी बारापात्रे ने निर्धारित 21 किमी अंतर 30 मिनिट या सर्वोत्तम वेळेत पूर्ण केले. 31 मिनिट 18 सेकंद वेळ नोंदवित रितेश धोटे दुसरा आणि 31 मिनिट 19 सेकंदासह मिथुन जाधव तिसरा आला.
21 वर्षाखालील मुलींची 11 किमी अंतराची शर्यत एलएडी महाविद्यालयाच्या संजना जोशीने 20 मिनिट 25 सेकंदात जिंकली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्नेहल जोशी (20.26.27)ने दुसरे व विनायक व्ही एम च्या श्रुष्टी शिवनीकर (20.32.94)ने तिसरे स्थान प्राप्त केले.
15 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या 15 किमी अंतराच्या शर्यतीत श्रेयस उपरवत (19.39.40)ने पहिला प्रांजल ढगे (19.40.77)ने दुसरा आणि आदिव सोपोरी (19.41.58)ने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये (8 किमी) सेंटर पॉईंट स्कुल ची शिवाली जाधव (15.0.61) प्रथम आली तर दिल्ली पब्लिक स्कुलची आदित्री पायासी (15.27.28) द्वितीय आणि बाल शिवाजी अकोला क्लब ची वैदेही बारस्कर (16.01.41) ने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
12 वर्षाखालील मुलांची 8 किमी अंतराची शर्यत राजवीर इढोले (15.22.04) ने जिंकली. रौनक सोनटक्के (16.55.91) दुसऱ्या क्रमांकावर तर हर्ष रोकडे (17.04.06) तिसऱ्या क्रमांकावर आला. मुलींच्या 5 किमी शर्यतीत मृण्मयी अलिवाल (14.16.38)ने प्रथम, इशानी लाटकर (14.48.16) ने द्वितीय आणि साशा खोडे (15.08.14) ने तृतीय क्रमांक पटकावला.
तीनही वयोगटातील विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. 21 वर्षाखालील वयोगटात मुलांना प्रथम बक्षीस 11 हजार रुपये, द्वितीय 9 हजार रुपये आणि तृतीय 7 हजार रुपये तर मुलींमध्ये प्रथम 8 हजार रुपये, द्वितीय 6 हजार रुपये आणि तृतीय 4 हजार रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले. 15 वर्षाखालील वयोगटात मुलांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 8 हजार, 6 हजार आणि 4 हजार रुपये तर मुलींना 6 हजार 4 हजार आणि 3 हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. 12 वर्षाखालील मुलांना 5 हजार, 4 हजार आणि 3 हजार रुपये, मुलींना 3 हजार, 2500 आणि 1500 असे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
सायकलिंग
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
21 वर्षाखालील मुले – 21 किमी
निकी बारापात्रे (30.44.36), रितेश धोटे (31.18.96), मिथुन जाधव (31.19.54)
21 वर्षाखालील मुली – 11 किमी
संजना जोशी (एलएडी कॉलेज- 20.25.46), स्नेहल जोशी (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय – 20.26.27), श्रुष्टी शिवनीकर (विनायक व्ही.एम.- 20.32.94)
15 वर्षाखालील मुले – 15 किमी
श्रेयस उपरवत (19.39.40), प्रांजल ढगे (19.40.77), आदिव सोपोरी (19.41.58)
15 वर्षाखालील मुली – 8 किमी
शिवाली जाधव (सीपीएस – 15.0.61), आदित्री पायासी (डीपीएस – 15.27.28), वैदेही बारस्कर (बाल शिवाजी अकोला – 16.1.41)
12 वर्षाखालील मुले – 8 किमी
राजवीर इढोले (सरस्वती – 15.22.04), रौनक सोनटक्के (16.55.91), हर्ष रोकडे (बीव्हीएम – 17.04.06)
12 वर्षाखालील मुली – 5 किमी
मृण्मयी अलिवाल (सेवासदन – 14.16.38), इशानी लाटकर (आरएस मुंडले – 14.48.16), साशा खोडे (नीरी मॉडर्न – 15.08.14)