संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर शहर घटकस्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी 12 पोलीस निरीक्षकांची बदली केली .त्यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांची विशेष शाखा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त ठिकाणी सीताबर्डी पोलीस स्टेशन चे (गुन्हे)पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच नविन कामठी पोलीस स्टेशन चे गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांची जुनी कामठी पोलीस स्टेशन चे गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.